The Art Of Saying No Book in Marathi, Damon Zahariades Books, Anuvadit, Translated, International Best Seller, Bestseller, Bestselling, Best Selling Motivational, Inspirational, Self Help, Personality Development, पुस्तके पुस्तकं, बुक, Positive Thinking : The Power of पॉवर ऑफ पॉजिटिव थिंकिंग पुस्तक मराठी प्रेरणादायी अनुवादीत बुक्स, द आर्ट ऑफ लेटिंग गो, सेईंग नो

Rate this post


Price: [price_with_discount]
(as of [price_update_date] – Details)


तुम्हाला गृहीत धरणार्या लोकांना तुम्ही वैतागला आहात का? इतर लोकांच्या कामांना तुमच्या गरजांपेक्षा जास्त महत्त्व देऊन तुम्ही थकला आहात का? आत्मविश्वासाने ‘नाही’ म्हणायला कसं शिकावं, आपला वेळ कसा वाचवायचा आणि हे करताना निरामय, संतुलित जीवनशैली कशी निर्माण करावी, हे जाणून घ्या.

‘द आर्ट ऑफ सेइंग नो’ मध्ये आपण पुढील बाबींविषयी जाणून घेणार आहोत :

इतरांना सतत खूश करण्याच्या प्रयत्नात लेखकाला झालेला त्रास आणि त्यावर केलेली मात.
‘नाही’ म्हणायचं असताना आपण ‘हो’ का म्हणतो याची प्रमुख 11 कारणं.
इतरांचा अनादर न करता ‘नाही’ म्हणण्यासाठीची दहा सोपी तंत्रं.
इतरांना ‘नाही’ म्हटल्याने तुम्ही वाईट का ठरत नाही?
सीमारेषा आखून घेणे, आपल्या निर्णयावर ठाम राहणे आणि हे करताना इतरांच्या आदरास पात्र ठरणे कसे साधावे हे तुम्हाला ‘द आर्ट ऑफ सेइंग नो’ शिकवेल.

From the Publisher

The Art Of Saying NoThe Art Of Saying No

तुम्हाला गृहीत धरणार्या लोकांना तुम्ही वैतागला आहात का? इतर लोकांच्या कामांना तुमच्या गरजांपेक्षा जास्त महत्त्व देऊन तुम्ही थकला आहात का? आत्मविश्वासाने ‘नाही’ म्हणायला कसं शिकावं, आपला वेळ कसा वाचवायचा आणि हे करताना निरामय, संतुलित जीवनशैली कशी निर्माण करावी, हे जाणून घ्या.

‘द आर्ट ऑफ सेइंग नो’ मध्ये आपण पुढील बाबींविषयी जाणून घेणार आहोत :

इतरांना सतत खूश करण्याच्या प्रयत्नात लेखकाला झालेला त्रास आणि त्यावर केलेली मात.

‘नाही’ म्हणायचं असताना आपण ‘हो’ का म्हणतो याची प्रमुख 11 कारणं.

इतरांचा अनादर न करता ‘नाही’ म्हणण्यासाठीची दहा सोपी तंत्रं.

इतरांना ‘नाही’ म्हटल्याने तुम्ही वाईट का ठरत नाही?

सीमारेषा आखून घेणे, आपल्या निर्णयावर ठाम राहणे आणि हे करताना इतरांच्या आदरास पात्र ठरणे कसे साधावे हे तुम्हाला ‘द आर्ट ऑफ सेइंग नो’ शिकवेल.

The Art Of Saying NoThe Art Of Saying No

असा एखादा मित्र किंवा परिचित माणूस आठवा, जो तुमच्या मते खूश ठेवणारा एक वैशिष्ट्यपूर्ण नमुना आहे. या माणसाला खरंतर तुम्ही मोजक्या गोड व्यक्तींपैकी एक मानता. तो किंवा ती नेहमी मदत करायला तत्पर असते. कधीही गरज वाटेल तेव्हा त्याला किंवा तिला तुम्ही मदतीसाठी गृहीत धरू शकता. अशी माणसं लगेचच आनंदाने त्यांचं काम बाजूला ठेवून तुम्हाला काय हवंय, कशाची गरज आहे पाठीमागे लागतात.

असं वागणं खासगी पातळीवर तुम्हाला नको वाटण्याइतकं ओळखीचं आहे का? यातलं काही तुम्हालाही लागू होतंय का? उदाहरणार्थ, समजा कुणी तुमच्याकडे मदत मागितली, तर तुम्ही तत्काळ हातातलं काम बाजूला सारून, ‘हो तर!’ म्हणता?

आता इथंच मोठा वादाचा विषय आहे : सतत इतरांच्या प्राधान्यक्रमाला स्वत:च्या आधी स्थान देण्यातून तुम्हाला दु:खी, चिंतामग्न आणि थकल्यासारखं वाटतं का?

असं असेल तर मग हे पुस्तक तुमच्यासाठी आहे.

लोकांना नाही म्हणू शकणं हे एक विकसित करण्याजोगं अत्यंत महत्त्वाचं कौशल्य आहे. त्यामुळं तुमच्या स्वत:च्या आवडीनिवडी मग त्या खासगी असोत की व्यावसायिक, त्यांचा पाठलाग करण्यासाठी तुम्ही मोकळे होता. त्यातून अखेर तुमच्या उत्पादकतेत वाढ होणं, नातेसंबंध हे होतंच; पण आजवर तुम्हाला अनोळखी असणार्‍या शांतवणार्‍या आत्मविश्वासाने तुम्ही भरून जाता.

नाही म्हणू शकण्याची क्षमता तुम्हाला मुक्त करते. मात्र हे कौशल्य वाढवत नेण्याची गोष्ट जरा अवघडच. आपल्यापैकी बर्‍याच जणांसाठी वर्षानुवर्षे जे केलं तो प्रवास अगदी उलट दिशेनं करण्याची ही गोष्ट. नाही म्हणणं म्हणजे जन्मभर आपल्या पालक, शिक्षक, बॉस, आणि कुटुंबीय यांनी जो उपदेश आपल्यात रुजवला तो एका अर्थी निष्फळ ठरवण्याचा प्रकार.

पण हे प्रयत्न फार मोलाचे. एकदा तुमच्यात विनयपूर्ण आत्मविश्वासाने ‘नाही’ म्हणण्याची क्षमता भिनली आणि नेहमी तुम्ही तिचा वापर करू लागलात की आसपासचे लोक तुमच्याकडे कसे बघतात, त्यातला बदल तुमच्या लक्षात येईल. ते तुमच्याकडे अधिक आदराने पाहतील, वेळेला किंमत देतील आणि तुम्हाला ते अनुयायी नव्हे तर नेता म्हणून भेटायला येतील.

The Art Of Saying NoThe Art Of Saying No

‘नाही’ हा इंग्रजीतला आणि मराठीतलाही अगदीच लहानसा शब्द आहे. तरीही आपण बहुतांशी लोक हे मान्य करू की या शब्दांत इतकी जबरदस्त शक्ती आहे की आपण तो उच्चारायला घाबरतो. काही प्रसंगांत जेव्हा नकार देणं आपण जमवलेलं असतं तेव्हा सहजपणानं आपल्या हेतूंना कमी लेखतो, काहीतरी सबबी सांगतो आणि विनंतीकर्त्याची माफी मागून टाकतो.

इतक्या लहान शब्दामध्ये इतकं वजन कुठून येतं? आपण तो उच्चारायला इतकं का चाचरतो?

या पुस्तकात आपल्याला ‘नाही’ म्हणणं इतकं जड का जातं, यामागच्या सर्वसाधारण कारणांना ठळक करत त्यांचा नीट उलगडा करणार आहोत. तुमच्या स्वत:च्या आयुष्यातील त्यातील कारणं तुम्हाला ओळखता येतील. यात काही शंका नाही.

आपल्यापैकी बहुतेकजण ‘नाही’ म्हणणं हे खूप उद्धटपणाचं आणि अहंकाराचं लक्षण आहे, हाच विश्वास बाळगून असतात. मग त्यांच्या जगण्याच्या मूल्यप्रणालीचा तो एक महत्त्वाचा भाग बनतो. त्यातून आपलं बरंचस बालपण आणि अर्धअधिक प्रौढत्व आपल्याला प्रतिष्ठित आणि आदरास पात्र वाटतं, अशा प्रतिमेचं प्रतिबिंब बनण्याचा प्रयत्न करण्यात खर्ची पडतं.

याचा परिणाम?

आपल्याभोवती असणार्‍या सगळ्यांना आपण ‘हो…हो’ म्हणत सुटतो. अगदी आपण टोकाचे वैतागलेले असू, संतापलेले असू किंवा मत्सराने ग्रासलेले असू तरी आपण ‘हो’ म्हणतो.

नाही म्हणण्याचं इतकं भय वाटण्यामागची अनारोग्यकारक कारणं लवकरच आपण शिकणार आहोत. काही स्पष्ट दिसणारी असतात, काही तितकी लक्षात येत नाहीत, त्यांना ओळखायला आहोत. या पहिल्या पायरीवर चढल्यामुळे नाही म्हणणं म्हणजे कुजकेपणा, बथ्थडपणा किंवा स्वार्थीपणा या चुकीच्या समजातून आपण स्वत:ला सोडवणार आहोत.

The Art Of Saying NoThe Art Of Saying No

Damon ZahariadesDamon Zahariades

डेमन झहारियाज

आपली निर्मितीक्षमता कशी वाढवावी, वेळेचे नियोजन कसे करावे आणि या प्रवासात तुम्हाला अधिक सुखकारक व आनंददायी जीवनशैली कशी निर्माण करावी हे अॅमेझॉनचे बेस्ट सेलिंग लेखक डेमन झहारियाज तुम्हाला टप्प्याटप्प्याने आणि कृतिप्रवण सल्ला देऊन शिकवतील. त्यांची मार्गदर्शनपर पुस्तकं वेगवान मांडणी आणि तत्काळ उपयोगात आणता येतील असे कृतिशील सल्ले यासाठी लोकप्रिय आहेत. त्यांच्या पुस्तकातून वाचकांना अधिक चांगल्या, सकारात्मक जीवनशैलीचा आनंद मिळाला आहे.

Publisher ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd.; First Edition (13 March 2023); Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Chhatrapati Sambhajinagar 431005, Maharashtra, India, 9881745605
Language ‏ : ‎ Marathi
Paperback ‏ : ‎ 144 pages
ISBN-10 ‏ : ‎ 9352203844
ISBN-13 ‏ : ‎ 978-9352203840
Item Weight ‏ : ‎ 160 g
Dimensions ‏ : ‎ 20.3 x 25.4 x 4.7 cm
Country of Origin ‏ : ‎ India
Net Quantity ‏ : ‎ 1 Count
Packer ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Chhatrapati Sambhajinagar 431005, Maharashtra, India, 9881745605
Generic Name ‏ : ‎ Book

Leave a Comment

Stay informed about the latest government job updates with our Sarkari Job Update website. We provide timely and accurate information on upcoming government job vacancies, application deadlines, exam schedules, and more.

Categories

Category 1

Category 2

Category 3

Category 4

Category 5